sharayu-prakashan

Shrimad Bhagavat Rahasya

श्रीमद्भागवत रहस्य

एक अत्यंत आगळा वेगळा ग्रंथ

या ग्रंथाची वैशिष्ठे

यात  मूळ  भागवत ग्रंथ जसाच्या तसा दिलेला  आहे त्यामुळे मूळ भागवत ग्रंथाच्या वाचनाचा आनंद मिळतो त्यावरील  निरूपण “भागवतरहस्य”  या शिर्षकाखाली  लिहिलेले आहे.  प्रत्येक कथेतील व ज्ञानबोध वचनातील गूढ रहस्य पूर्णपणे उलगडून सांगितले आहे. त्यामुळे त्यामुळे वाचकाला हे गूढ रहस्य  कळल्याच्या आनंद होतो.

अवधूत सद्गुरू व भार्गव  हा शिष्य  यांच्या संवादातून हे  भागवत रहस्य  साकारले आहे. भार्गव हा शिष्य अवधूत  सद्गुरूंच्या चरणाशी बसून भागवत ग्रंथ वाचत आहे.  वाचन  करताना  त्याच्या मनात अचानक  काही प्रश्न किंवा शंका उद्भवतात, त्याच्या बुद्धिला किंवा तर्काला न पटणाऱ्या  गोष्टी येतात. त्या सर्व शंकांचे समाधान  सद्गुरू अवधूत  अत्यंत सोप्या भाषेत व अत्यंत सखोल व विस्तृतपणे करतात तेच भागवत रहस्य  या शिर्षकाखाली दिलेले आहे.

वाचकाचा अनुभव: 

बऱ्याच वाचकांनी  हा ग्रंथ १० ते १५ वेळा वाचलेला  आहे.

एवढ्यांदा वाचूनही त्यांना कंटाळा तर  येत नाहीच  उलट प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट नवीन वाचत  आहोत असे जाणवते. त्यातील रस कमी न होता उलट वाढतच राहतो .

बरीच  तरूण मुले हा ग्रंथ नियमितपणे रोज  झोण्याच्या आधी वाचतात. त्यांच्या असा अनुभव आहे की हा ग्रंथ वाल्यामुळे दिवसभरातील सर्व ताणतणाव निघून जातात. मन शांत होते व शांत झोप लागते.

एका ९३ वर्षांच्या आजीने हा ग्रंथ आजपर्यंत  २५ वेळा वाचलेला आहे. व अजुनहीं दररोज तिचे वाचन  सुरूच  आहे.

ग्रंथाचे नाव: ”श्रीमदभांगवत रहस्य ” (प्रथम स्कंध । लेखक: डॉ. चंद्रशेखर दिनकर आष्टीकर M.Com. Ph.D. (HRD) Murmbai University. आद्यात्मिक नाव:  श्रीनिजधामानंदस्वामी, गुरूपरंपरा श्रीदत्तपरंपरा

प्रकाशकांचे नाव: शरयू प्रकाशन

Want to buy this book?