Sale!

480.00

आजच्या युगात मनुष्याला अत्यंत आवश्यक गोष्ट कुठली असा प्रश्न विचारला असता शांती समाधान या एकाच उत्तरावर सर्वाचे एकमत होईल. आज सर्व जगात अशांती पसरलेली आहे. प्रत्येक मनुष्य अशांत आहे म्हणून कुटुंबात अशांती आहे. कुटुंबात अशांती आहे म्हणून समाजात अशांती आहे. समाजात अशांती आहे म्हणून देशात अशांती आहे. देशात अशांती आहे म्हणून सर्व जगात अशांती आहे. जगात शांती नांदावी असे वाटत असेल तर आधी प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी शांती यावी यासाठी प्रयत्न करावयास पाहिजे. देशात शांती रहावी यासाठी केलेले प्रयत्न विफल होतील.

भगवान व्यासांनी महाभारतासारखा अद्भुत ग्रंथ लिहिला परंतु त्यांना शांती मिळाली नाही ते अत्यंत उदासीन झाले. त्यांचे मन अशांत झाले. तेव्हा वेदव्यासांचे गुरू नारद तेथे प्रगट झाले व त्यांनी वेदव्यासांना श्रीमद्‌भागवत्‌  हा ग्रंथ लिहावयास प्रेरणा दिली व हया ग्रंथाच्या लिखाणाने व्यासांना पूर्ण शांती व समाधान प्राप्त झाले. ज्या ग्रंथाने वेदव्यासांसारख्या माहात्म्यांना शांती समाधानाचा अनुभव दिला त्या ग्रंथाने सर्वसामान्यांना शांती प्राप्त होईल यात काहीच शंका नाही.

18 in stock

Category:

श्रीमद्‌भागवत रहस्य

ग्रंथाची भूमिका

भारतातील सर्वच संत माहात्म्यांनी या ग्रंथाची थोरवी मुक्तंकंठाने गायिली आहे. महाराष्ट´ातील थोर संत श्रीएकनाथ महाराज यांनी श्रीमद्‌भागवताच्या एकादशस्कंधावर विस्तृत ओवीबद्ध भक्तीज्ञानमय अत्यंत सुंदर असा ग्रंथ लिहिला आहे. उत्तरेतील थोर संत सूरदास यांनी तर भागवतावर आधारित स्वानुभवाच्या आधारे ‘सूर सागर’ या नावाने एक काव्यमय ग्रंथ लिहिला आहे. त्यातील पदे अत्यंत गेय व प्रासादीक आहेत. अनेक ठिकाणी पौराणिक लोक श्रीमद्‌भागवताचे सप्ताह करीत असतात. हिंदी भाषिक लोकांमध्ये याचा प्रसार जास्त आहे. मात्र मराठी भाषिक लोकांमध्येही हा ग्रंथ लोकप्रिय आहे व गावोगावी याचे सप्ताह होत असतात. तरीही आश्चर्याची गोष्ट अशी की अनेक लोकांना अजूनही या ग्रंथाची माहिती नाही. काही लोक तर भगवद्‌गीता म्हणजेच भागवत्‌ असे समजतात.

आपले रामायण, महाभारत, श्रीमद्‌भागवत हे तीन महान ग्रंथ व आपल्या संतसत्पुरूषांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आदि तसेच त्यानंतरही अनेक संतसत्पुरूषांनी लिहिलेले ग्रंथ व आताही संतसत्पुरूष जे ग्रंथ लिहित आहेत. हीच आपली खरी भारतीय संस्कृती आहे. ह्याच ग्रंथांतील ज्ञान, उपदेश, संदेश, कथा, बोध, यांचा संस्कार जनमानसावर व्हावा म्हणून कथा, कीर्तन, नाटक, नृत्य, संगीत या माध्यमांचा वापर केला जात असे व आजही केला जात आहे. म्हणून ही साधने म्हणजेच भारतीय संस्कृती असे चुकीचे समीकरण झाले आहे. कारण आजच्या काळात ह्या माध्यमांद्वारे अनेक इतर संस्कार,  पाश्चात्य संस्कृतीचे संस्कार, व चुकीचे संस्कार या माध्यमाद्वारे प्रगट केले जातात त्यांचा आपल्या या ग्रंथातील शिकवणुकीशी, उपदेशाशी, बोधाशी सुतरामही संबंध असत नाही. उलट विरोधाभासच असतो व यालाच भारतीय संस्कृती म्हटले जाते व भारतीय संस्कृती मध्ये समाविष्ट करुन घेतले जाते. त्यामुळे खर्‍या भारतीय संस्कृती बद्धल सर्वसामान्यांच्या मनात एकतर चुकीच्या कल्पना  रुजतात किंवा त्यांच्या मनात याबद्धल कायम गोंधळ व समजुतींचा घोटाळा असतो.

या ग्रंथावरील रहस्य लिहिण्यामागे हा ही एक उद्येश आहे की हा त्यांच्या मनातील गोंधळ काढून टाकुन त्यांना सत्य मार्ग काय आहे तो कळावा. त्या सत्य मार्गाने जायचे किंवा नाही. किंवा कधी व कसे जायचे हा ज्याच्या त्याच्या तळमळीचा प्रश्न आहे. पण निदान योग्य सत्य व हितकर मार्ग कोणता हे तरी त्यांना निश्चितपणे कळेल. संतश्रेष्ठ श्रीतुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे-

झाडू संतांचे मार्ग आडरानी पडले जन॥ हा या श्रीमद्‌भागवत रहस्य ग्रंथ लिहिण्यामागचा एक उद्येश आहे.

श्रीमद्‌भागवत हा केवळ एक ग्रंथ नाही तर ती एक साधना आहे. संसारत्याग न करता याच संसारात राहून, गृहस्थाश्रमात  राहून संतसत्पुरुषांच्या मार्गदर्शनाने, सहवासाने, सत्संगतीने जीवन आनंदाचे कसे करून घ्यावे व ईश्वरप्राप्ती कशी करून घ्यावी याचे रहस्य या ग्रंथात आहे. पण सर्वसामान्याला ते कळू शकत नाही. म्हणून ‘भागवत रहस्य’ या नावाचा हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा सद्‌गुरुकृपेने झाली व असा हा ग्रंथ क्रमशः या त्रैमासिकात प्रकाशीत होत आहे हा माझ्यावरील सद्‌गुरुकृपेचा व भगवत्‌कृपेचा प्रसादच आहे.

भगवान श्रीकृष्णाने निजधामाला जाताना आपल्या परमप्रिय भक्त उद्धवाला या अद्‌भुत भागवत धर्माचा उपदेश केला व कलीयुगात याच भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य भगवंतांनी उद्धवाला करण्याची प्रेरणा दिली. त्याप्रमाणे उद्धवाने आपल्या अनुयायांसह या भागवत धर्माचा सर्व भारतभर प्रसार केला व भागवत धर्माची ध्वजा उंच फडकत ठेवली.  कथा, कीर्तन, प्रवचनद्वारे हा संतांनी आचरून उपदेशिलेला भागवत धर्म म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी उद्ववाला उपदेशीलेला सगुण प्रेम भक्तीचा मार्ग. पण तो प्रत्यक्ष आचरण करण्यासाठी मात्र संत सत्पुरुषांची संगतीच करावी  लागते.  आपल्या सर्व साधुसंतांनी, सत्पुरुषांनी या भागवतधर्माचीच शिकवण सर्वांना दिली. तुकाराम महाराज तर आपल्या अभंगात सांगतात

गीता भागवत सदैव उच्चारिता। पापाची तो वार्ता। राहे कोठे॥ गीता आणि भागवत या दोन ग्रंथांचे श्रवण मनन केले असता सर्व पाप नष्ट होते.

या भागवत धर्मामध्ये प्रेम, भक्ती, ज्ञान, योग, कर्म, इ. सर्व मार्गाचा सुंदर संगम झालेला आहे. द्वैत, अद्वैत,शुद्धाद्वैत, द्वैताद्वैत, मधुराद्वैत या सर्व सांप्रदायांच्या आचार्यांनी भागवताच्या आधारेच आपल्या मताचा प्रसार केला. भागवतात  सर्व मतांचा यथायोग्य समन्वय साधलेला आहे. भागवत धर्म हा कुठल्याही धर्माच्या पंथाच्या विरोधी नाही. हे त्याचे अविरोधित्व हेच सर्वांना सामावून घेते. भागवतधर्म सर्व मतभेदांच्या वर आहे. सर्व मतमतांतरात ऐक्यता करणारा आहे. म्हणून भागवत्‌ धर्म हा अत्यंत विशाल आहे, परमउदार आहे  व सर्वसमावेशक आहे. भागवत धर्मात सर्व जाति धर्म पंथातील संत होऊन गेले. अशा या महान ग्रंथाचे श्रवण मनन निदिध्यासन व्हावे या उद्देशानेच हे भागवत रहस्य सद्गगुरुकृपेने लिहिले गेले आहे. त्याचा लाभ सर्वांना व्हावा हीच परमेश्वर चरणि प्रार्थना. या ग्रंथाच्या प्रकाशन संबंधी सर्वच कार्यात आमचे शिष्य डॉ. मयुरेश अनिल मुळे यांचे सहकार्य मिळाले. त्यांची ही सेवा दत्तप्रभूंच्या चरणी रुजू झाली. त्यांना दत्तप्रभूंचे पूर्ण आशिर्वाद आहेत.

There are no reviews yet.

Be the first to review “श्रीमद्भागवत रहस्य – प्रथम स्कंध”